Sat. Jul 31st, 2021

मित्राच्या मदतीने पत्नीकडून पतीवर उकळतं तेल टाकत जीवघेणा हल्ला!

मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वसई पश्चिममध्ये घडली आहे. पतीचे पाय बांधून, अंगावर उकळतं तेल टाकत, डोळ्यात मिरची पूड, डोक्यावर हातोडीने वार करून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. तर पतीला मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

भविष्य भु-हागोहाय असं जखमी पतीचं नाव असून पत्नीचं नाव क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे.

काय घडलं नेमकं?

वसई पश्चिमच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे.

कौटुंबिक भांडणातून क्विन्सीयानं आपल्या पतीला मारहाण करताना उकलतं तेल त्याच्या अंगावर आणि डोळ्यात फेकलं.

तसंच हातोडीने डोक्यावर प्रहार केले.

घरात मिळेल त्या सामानाने त्याला मारहाण केली.

त्याचे पाय दोरखंडाने बांधून त्याला टॉयलेटमध्ये ठेवलं होतं.

जखमी भविष्यनं जीव वाचवण्यासाठी प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकल्यावर आजूबाजूचे रहिवाशी त्याच्या रुममध्ये पोहचले आणि त्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं.

ही सर्व मारहाण होत असताना त्यांची दोन लहान जुळी मुलंही घरी होती.

या प्रकरणी पत्नी क्विन्सीया भु-हागोहाय आणि तिचा मित्र सतवीर नायक याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पतीने केलेल्या आरोपानुसार पत्नी आणि तिच्या प्रियकराने हे कृत्य केलं आहे.

तर पत्नीने पोलिसांना सतवीर हा पतीचाच मित्र असल्याचं सांगितलं आहे.

घटनास्थळी सतवीर उपस्थित होता. त्यामुळं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

क्विन्सीयाच्या आईवडीलांनी भविष्य हा आपल्या मुलीला मारहाण करत असल्याच सांगितलं.

क्विन्सीया ही ख्रिश्चन तर भविष्य हा आसामचा मूळचा रहिवाशी होता.

या दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.

भविष्य हा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता.

ते वसईच्या उमेलमान परिसरातील प्रतापगड या सोसायटीमध्ये भाड्यानं राहात होते.

त्यांना दोन लहान जुळी मुलं ही आहेत.

भविष्यला पोलिसांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर क्विन्सीया आणि सतवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *