Sat. Aug 17th, 2019

पतीच्या PUBG चं वेड, पत्नीचा आत्महत्त्येचा प्रयत्न !

पतीला जडलेल्या पब्जीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने आत्महत्तेचा प्रयत्न केल्याचा भयानक प्रकार अहमदाबाद मधील हिरवाडी परिसरात घडला.

0Shares

पब्जी नावाच्या ऑनलाईन गेमने आपले सगळीकडेच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळतंय. अहमदाबादमध्येही या गेममुळे एक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. पतीला जडलेल्या PUBGच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने आत्महत्तेचा प्रयत्न केल्याचा प्रकार अहमदाबादमधील हिरवाडी परिसरात घडला. याप्रकरणी कृष्णानगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीला PUBG खेळायचं व्यसनच लागलं होतं.

तो दिवसरात्र PUBG खेळण्यात व्यस्त असायचा.

या गेमच्या व्यसनामुळे तो आपल्या पत्नी आणि लहान मुलाकडेही लक्ष देत नव्हता.

नेहमीप्रमाणेच मंगळवारी रात्रीही तो PUBG खेळण्यात तल्लीन होता.

तेव्हा कुटुंबालाही पुरेसा वेळ देण्याची मागणी त्याच्या पत्नीने त्याला अनेकवेळा केली.

यावरुन या दांपत्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं.

PUBG च्या आहारी गेलेल्या यापतीने पत्नीला अक्षरशः मारहाणदेखील केली.

हा सर्व प्रकार असह्य होऊन पत्नीने स्वत:ला गळफास लाऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.

ही बाब सासरच्या मंडळींच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तिला वाचवलं आणि जवळच्या रुग्णालयात नेलं.

त्या महिलेची प्रकृती आता बरी असून पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिची चौकशी केली.

या महिलेने दोन वर्षांपूर्वीही घरगुती हिंसेची तक्रार दाखल केली होती.

तेव्हा या दोघांची समजुत घालून समोपचाराने हा प्रश्न सोडविण्यात आला होता. मात्र आता PUBG मुळे पुन्हा घरात तिला मारहाण होऊ लागल्यामुळे तिने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *