Sat. Jun 19th, 2021

विकिपीडियाने फिनालेआधीच जाहिर केला ‘बिग बॉस १४’चा विजेता

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिंग बॉस हा खूप लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस १४’या शोमध्ये रोज कोणाचे ना कोणाचे खडके उडत असतात. राखी या शोमध्ये आल्यानं ‘शो’ची टीआरपी आणखी वाढली आहे. या ‘शो’चे सूत्रसंचालन बॉलिवूडचा भाईजान सलमान करत आहे.

शिवाय बिग बॉस 14 मधील स्पर्धक रुबीना दिलैक, राहुल वैद्य, निक्की तंबोळी, अभिनव शुक्ला, अर्शी खान, अली गोणी, राखी सावंत, ही स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहेत. पण या स्पर्धकांपैकी विजेता कोण होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडत आहे. दरम्यान गुगलने तर फिनालेआधीच बिग बॉस १४चा विजेता जाहिर करून टाकले आहे.

Bigg Boss 14 Winner Name गुगलवर सर्च करताच रुबीना दिलैक हे नाव येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ पाहायला मिळत आहे. शिवाय बिग बॉस १४ची फिनाले झालेली नाही तरी देखील रुबीना दिलैक नाव येत आहे. बिग बॉस १४मध्ये सध्याला राखी सावंत, रुबीना दिलैक, राहुल वैद्य, निक्की तंबोळी, अभिनव शुक्ला, अली गोणी, अर्शी खान हे स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता या स्पर्धकांमधून कोण जिंकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. आता या ‘शो’मध्ये कोण जिंकणार हा येणार काळच सांगेल मात्र या स्पर्धकांचे चाहते त्यांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *