Fri. Sep 20th, 2019

कॉंग्रेसचे आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेवर ?

0Shares
विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असताना विरोधी पक्षातील दिग्गज नेते युतीत प्रवेश करत आहे. विरोधी पक्षातून भाजपा आणि शिवसेनेत होत असलेल्या इनकमिंगमुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्याचे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार आनंदराव पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे.

आनंदराव पाटील यांचा भाजप प्रवेश ?

साताऱ्याचे कॉंग्रेस माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आनंदराव पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली आहे.
आमदार पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
13 सप्टेंबर रोजी आनंदराव पाटील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटलं जात आहे.
आनंदराव पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर पुस्तक लिहिले आहे.
त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी असल्याचे म्हटलं आहे.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *