Mon. Jan 24th, 2022

या निवडणुकीत तरी काँग्रेस कोल्हापूरमध्ये उभारी घेणार का?

एकेकाळी काँग्रेसचा बलेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा एकही आमदार नाही. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचं पूर्णपणे पानिपत झालंय. पक्षांतर्गत दुफळीचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. या निवडणुकीत तरी काँग्रेस भोपळा फोडणार का हाच प्रश्न आहे.

काँग्रेसची घसरण थांबणार?

सहकाराची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होतं.

जिल्ह्यात त्या काळी असलेल्या बाराही मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून येत होते.

काँग्रेसचा हा आलेख वाढता राहील आणि त्यांच्या वर्चस्वाला कोणी धक्का देणार नाही अशी त्या काळी स्थिती होती.

मात्र हा आलेख वाढण्याऐवजी 1980 पासून तो घसरताना दिसत आहे.

त्या काळात 10 आमदारांची संख्या असलेला पक्ष आता शून्यावर येऊन ठेपलाय.

1980 – 10 आमदार

1985 –  06 आमदार

1990 –  07 आमदार

1999 – 05 आमदार

2004 –  03 आमदार

2009 –  02 आमदार

2014 – 00 आमदार

काँग्रेसची वाताहत कशामुळे?

काँग्रेसची वाताहत होण्याची अनेक कारणं आहेत.

त्यापैकी अंतर्गत कुरघोड्या यामुळे पक्षाची मोठी हानी झालीय.

आमदार सतेज पाटील आणि तत्कालीन विधानपरिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्या वादात अडकलेल्या काँग्रेसला याचे मोठे ग्रहण लागलंय.

पक्ष वाढवण्याऐवजी स्वतःचा गट वाढवण्यात त्यांनी लक्ष दिल्याचा फटका पक्षाला बसला.

दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या, कारखाने, दूध संघ यातून सतेज पाटील, पी एन पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात मतभेद आहेत.

त्यातून आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष असतांनाही राजीनामा देत पक्षाला धक्का दिला.

यातून सवरण्याचे आव्हान नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे.

उपाय काय?

काँग्रेस यातून उभारू घेऊ शकतो मात्र त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आत्ताच्या रणधुमाळीत तरी एकदिलाने काँग्रेस काम करणार की नेते ये रे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा स्वतःचा गट सांभाळणार यावरच जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *