Mon. Jan 24th, 2022

गांधी शिवसेनेच्या सल्ल्याने चालणार?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राहुल गांधी आता शिवसेनेच्या सल्ल्याने चालणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच काँग्रेसने सगळ्यांना सोबत घ्यावे, असा आग्रह संयज राऊत यांनी गांधी घराण्याला केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच विरोधकांनी एकत्र येण्यासाठी तुम्ही पुढाकार घेण्याचा सल्लाही संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. तसेच काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी शक्य नाही. त्यामुळे विरोधकांचा चेहरा कोण असेल यावर चर्चा होऊ शकते, असेही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधकांची एकच आघाडी असायला हवी, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेना काँग्रेस यूपीएचा भाग होणार का? यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर याविषयी बोलणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *