राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ?

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवास्थानी ही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या चर्चेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नेमकी काय आहे चर्चा ?
लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाल्यामुळे कॉंग्रेसची सध्या विरोधीपक्ष पदासाठी धडपड सुरू आहे.
यासंदर्भातच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे समजते आहे.
कॉंग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या अनेक पक्षांना एकत्र आणण्यासाठी हालचाल सुरू असल्याचेही चर्चा आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.
त्याचबरोबर काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असल्यामुळे त्या संदर्भातही चर्चा झाल्याचे समजते आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.