पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या भीषण महागाईमुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे. दरम्यान इंधनाच्या दरांनी राज्यात शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागत आहे. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकार कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल वितरणात आणणार आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. केंद्र सरकार राखीव साठ्यातून इंधनाचा पुरवठा करणार असून पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल वितरणात आणणार आहे. त्यामुळे लवकरच इंधनाच्या किंमती स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.