Wed. Oct 5th, 2022

‘केंद्राने नाही दिली, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला मोफत कोरोना लस उपलब्ध करुन देऊ’;अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी दिलीगिरी दाखवत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.“केंद्र काय करते, ते आम्ही पाहू. केंद्राने मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला ती लस मोफत उपलब्ध करुन देऊ” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. “सर्व देशवासियांना ही लस मोफत उपलब्ध करुन देण्यात यावी असं मी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. कारण आयुष्य वाचवणारी ही लस विकत घेणे, अनेजणांना परवडणारे नाही” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. हे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम या लसीचा डोस दिला जाईल. मागच्या वर्षभरापासून लोक त्रास सहन करत आहे. या लसीमुळे त्यांना दिलासा मिळेल” अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली असून लसीबद्दल अफवा न पसरवण्याचे सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. “सुरक्षितता आणि सर्व आवश्यक काळजी घेऊन, केंद्र आणि आपल्या शास्त्रज्ञांनी या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे कुठलाही संशय न बाळगता लोकांनी लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे” असं केजरीवाल म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.