सत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू – प्रकाश आंबेडकर

PTI2_9_2019_000081B
आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष अनेक आश्वासने देण्यात व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ल्याविषयी काही भाष्य करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू असे वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांना सोलापूरातून उमेदवारी जाहीर केली आहे.
यवतमाळ येथील प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पुलवामा हल्ल्याबद्दल काही भाष्य करू शकत नाही कारण निवडणूक आयोग हे बाहुले असल्याचे म्हटलं आहे.
त्यामुळे सत्तेत येऊ द्या निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू असे म्हटलं आहे.
आंबेडकरांच्या अशा वक्तव्यामुळे खळबळ उडाली असल्याचे समजते आहे.