Fri. Aug 12th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर मी सुद्धा राजकारण सोडेन – स्मृती इराणी   

जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे हे फक्त नरेंद्र मोदी होते.

त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन.

अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.

‘वर्डस काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात स्मृती इराणी बोलत होत्या. उद्योजक अतुल चोरडिया, सागर चोरडिया, महोत्सवाच्या आयोजक वर्षा चोरडिया, सबिना संघवी आणि ‘वर्डस काउंट’ या संकल्पनेच्याप्रणेत्या अद्वैता कला हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर तर संघटन हे राजकारणावर सुरू असून एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते.

मात्र विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला असता तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे, आज विविध माध्यमांचा सर्वत्र प्रभाव आहे.

मात्र काही दशकांपूर्वी जेव्हा हा प्रभाव नव्हता, तेव्हा सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांसारख्या महिला नेत्यांनी आपला राजकारणातील प्रवास सुरू केला होता.

तो काल आजच्या काळापेक्षा नक्कीच कठीण होता, त्यामुळे या दोघीही माझ्यासाठी प्रेरणा आहेत, असेही स्मृती इराणी यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.