Sun. Jun 20th, 2021

माझ्या उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत- शरद पवार

माढा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आज शरद पवार संगोल्यात दुष्काळ परिषदेला हजेरी लावली. कालच पवार यांनी मी इच्छुक नाही मात्र जेष्ठ नेत्यांचा आग्रह आहे, अशी गुगली टाकल्याने सर्वांचं लक्ष शरद पवार काय बोलतायत याकडे लागलं होतं.

शरद पवारांना निवडणूक लढवण्याची मागणी

या दुष्काळी सभेची सुरुवात मोदींना आव्हान देऊन जिल्हाद्यक्ष दीपक साळुंखे यांनी केली जर पवार साहेबांचा पराभव करायचा असेल, तर स्वतः मोदींनी रिंगणात उतरावं असं खुलं आव्हान देण्यात आलं.

यावेळी माढा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली. जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला. तर खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी असा आग्रह केला. महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या हितासाठी पवार साहेबांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली.

काय म्हणाले पवार?

माढा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करून उमेदवारीचा दोन दिवसात निर्णय घेऊ.

मला पराभूत करू म्हणणाऱ्यांनी आणि माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला.

भाजपकडून पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव पुढे येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचं आहे असे समजावं.

सहा हजार रुपये वर्षाला देऊन सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केलीय.

शेतकऱ्यांच्या कॉलेजला, शाळेला जाणाऱ्या मुली उपोषण करत आहेत, ही या देशासाठी गंभीर गोष्ट आहे.

फेब्रुवारी सुरू झाला तरी अजून चारा छावण्याचा पत्ता नाही.

पीक विमा योजना रक्कम अजून पदरात पडली नाही.

कर्जमाफी किती जणांनी केली याचे आकडे देत नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *