Fri. Sep 30th, 2022

फेसबुक, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम बंद होण्याची शक्यता ?

भारतात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या फेसबुक, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनाने या समाजमाध्यमांच्या कंपन्यांसाठी धोरणांमध्ये बदल करत नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधीही दिला होता. हा कालावधी २६ मे रोजी संपणार आहे.

तथापि, कू सोडून इतर कोणत्याही सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन नियमांचे कथित पालन केले नाही. या कंपन्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वे गंभीरपणे घेत नाहीत की ते करण्यास ते तयार नाहीत का हा एक गंभीर प्रश्न उद्भवतो.

कंपन्यांनी अद्यापही या नियमांचं पालन न केल्याने या समाजमाध्यमांच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात. २५ फेब्रुवारी २०२१ ला केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कंम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमण्यास सांगितलं होते. हे सर्वजण भारतातून काम करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत.

काय होती सरकारची नियमावली?

१. या कंपन्यांना भारतात एका तक्रार निवारण अधिकाऱ्याची आणि एका विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक बंधनकारक आहे.
२. तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासात त्याची दखल घेतली जावी, 15 दिवसांत त्याचा निवाडा व्हावा.
३. मुख्यालयं विदेशात असली तरी केंद्र सरकारच्या व्यवहारासाठी एक अधिकृत पत्ता देशात असावा.

तीन महिने उलटले तरी केंद्राच्या या नियमावलीचं पालन ना फेसबुकनं केलंय, ना ट्विटरनं, ना इन्स्टाग्रामनं! ट्विटरला पर्याय म्हणून निघालेली स्वेदशी कू ही एकमेव कंपनी आहे ज्यांनी केंद्राच्या नियमांचं पालन केलं. केंद्र सरकारनं दिलेली ही मुदत आज संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार या कंपन्यांवर लगेच कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.