Fri. Jan 28th, 2022

Pulwama Attack: भारत-पाक सामन्यावर विराटनं केलं ‘हे’ महत्वाचं विधान

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी होत आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मतं मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही मौन सोडले आहे.

‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल,’ असे विराटने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने भूमिका स्पष्ट केली आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ला अतिशय दुख:द आहे, असे विराट म्हणाला. हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती त्याने संवेदना व्यक्त केल्या.

‘पाकिस्तानसोबत खेळण्याचा निर्णय हा बीसीसीआय आणि केंद्र सरकार घेतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल’, असे विराट कोहली म्हणाला.

विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी सामना होणार आहे.

पाकिस्तानसोबत न खेळण्याची भूमिका काही माजी क्रिकेटपटूंनी मांडली होती.

तर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानला आयते गुण बहाल करण्यापेक्षा सामन्यात पराभूत करावे अशी भूमिका मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *