Sun. Jan 16th, 2022

पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार? आरोग्य विभागाची परवानगी

   शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात यावे याबाबत प्रस्ताव मांडला होता. यावर आरोग्य विभागाने संमती दिलेली आहे. राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  महाराष्ट्रात सध्या ७०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तसेच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दरही चांगला आहे. त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवून मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

  राज्यात पाचवीपासूनचे पुढील वर्ग सुरू आहेत. तसेच पहिली ते चौथीचेही वर्ग सुरू करण्यासाठी शालेय विभागाने प्रस्ताव मांडला. तसेच या प्रस्तावाला आरोग्य विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील आदेश जारी केले जातील, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट सौम्य

  महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट सौम्य स्वरुपाची शक्यता असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी संसर्गित झाला तर तो त्याच्या आजी आणि आजोबांना संसर्गित करु शकतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असे राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *