Tue. May 17th, 2022

यशवंत जाधव यांची अडचण वाढणार?

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराने मिळवलेल्या संपत्तीचा नवा तपशील समोर आला आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आक्षेपार्ह मालमत्तांची संख्या ३६ वरून ५३ वर पोहचवली आहे. जाधवांच्या मालमत्ता प्रकरणी नवा खुलासा समोर आल्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यशवंत जाधव यांच्या मालमत्ता प्रकरणी आयकर विभागाने नवा खुलासा केला आहे. यशवंत जाधवांच्या एकूण आक्षेपार्ह संपत्तींची संख्या ३६ नव्हे तर ५३ वर पोहचली आहे. गेल्या दहा दिवसांपासून यशवंत जाधवांच्या आक्षेपार्ह मालमत्त्यांची तपासणी आणि खातरजमा करण्यास आयकर विभागाच्या कारवाईला वेग आला आहे.

यशवंत जाधवांबाबत याआधी काय घडलंय?

  • यशवंत जाधवांवर आयकर विभागाची कारवाई
  • पंधरा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
  • ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपयाचे घड्याळ दिल्याची नोंद उघड
  • कोरोना काळात १३० कोटी रुपयांच्या ३६ मालमत्तांची खरेदी – सूत्र
  • संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले.
  • बोगस कंपनीच्या माध्यमातून ३१ फ्लॅट्सची खरेदी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.