Mon. May 10th, 2021

पाकिस्तानात माझा प्रचंड मानसिक छळ – अभिनंदन

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही.

हे ही वाचा- अभिनंदन परतण्यापूर्वीच त्यांच्यावर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांची चढाओढ!

पाकिस्तानात मानसिक छळ

पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला.

भारतात परतल्यानंतर अभिनंदन वर्थमान यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानात आपला शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, असं अभिनंदन यांनी सांगितलं.

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

हे ही वाचा- #WelcomeHomeAbhinandan निधड्या छातीने अभिनंदन मायदेशी परतले

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने भारताकडे सोपवले.

संबंधित बातमी- अभिनंदनचे अपमानजनक 11 व्हिडीओ युट्यूबवरून डिलीट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *