Thu. Jan 27th, 2022

#WelcomeHomeAbhinandan निधड्या छातीने अभिनंदन मायदेशी परतले

आजचा दिवस हा समस्त देशवासीयांसाठी अभिनंदन दिवस ठरला आहे. पाकिस्तानचे हल्ले रोखताना पाकिस्तानमध्ये बंदी झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तब्बल तीन दिवसांनी भारतात परतले.

सर्व कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर अभिनंदन यांनी रात्री 9.20 वाजता भारताच्या भूमीत पाऊल ठेवलं.

अभिनंदन यांच्या सुटकेची पाकिस्तानने घोषणा केल्यानंतर वाघा बॉर्डरवर सकाळपासूनच लोकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली.

मात्र अभिनंदन यांच्यासुटकेसाठी उशिर होत होता. दुपारी 2 वाजता होणारी सुटका व्हायला रात्रीचे 9.20 झाले.

अभिनंदन यांची सुटकेनंतर दाखवण्यासाठी पाकिस्तानमध्ये अभिनंदन यांची नवी व्हिडीओ टेप जारी करण्यात आली. पाकिस्तानने अभिनंदन यांची युनिफॉर्मध्ये मुलाखत रेकॉर्ड केली.

अभिनंदन यांची हस्तातरणाची प्रक्रिया सुरू केली.

पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना हस्तांतरीत केलं.

अभिनंदन यांची तात्काळ सुटका करून भारतात पाठवण्याची मागणी भारताने केली होती.

जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांची सुटका करण्याची कूटनीती भारताने आखली.

कोणतीही चर्चा न करता बिनाशर्त पाकिस्तानने अभिनंदन यांना आपल्याकडे सोपवावं, अशी भूमिका भारताने ठामपणे मांडली. पाकिस्ताननेही शांतता संकेत म्हणून या मागणीला प्रतिसाद देत 01 मार्च रोजी अभिनंदन यांची सुटका केली.

सुटकेनंतर भारतीय हवाई दलाची पत्रकार परिषद झाली. यामध्ये अभिनंदन यांना वायू सेनेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवणार असल्याचं तसंच त्यांची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचं सांगण्यात आलं.

त्यानंतर अमृतसरहून त्यांना दिल्लीला नेण्यात आलं.

संबंधित बातम्या

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *