राज्यात हुडहुडी वाढली; महाबळेश्वरमध्ये 0 अंश तापमान

राज्यात कडाक्याची थंडी पडल्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी  गारठले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतही थंडीचा पारा घसरल्यामुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. मुंबईसह नाशिक येथे 4 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आला आहे. तसेच महाबळेश्वरमध्येही 0 अंश सेल्सियस तापमानावर पोहोचला आहे. वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले आहेत. या थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये गर्दी केली आहे.

त्याचबरोबर पुणे येथे 5.1 तर नगरमध्ये 6.1, सातारा 6.8 अंश, जळगाव 8, सांगली 8.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे. थंडीची तीव्रता वाढत असल्यामुळे नाशिकमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे.  उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

 

 

 

 

Exit mobile version