Wed. Aug 4th, 2021

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असणार आहे. विधानसभेचे कामकाज 11 वाजता तर विधानपरिषदेचे कामकाज 12 वाजता सुरू होणार आहे.

या हिवाळी अधिवेशनात महाविकासआघडी सरकारचा चांगलाच कस लागणार आहे. विरोधी पक्ष महाविकासआघाडीला राज्यातील अनेक प्रश्नांवरुन घेरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळणार आहे.

गेल्या वर्षी 2018 ला विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं होतं. हे हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेबंर पर्यंत झालं होतं.

राज्य विधिमंडळाची एका वर्षात 3 अधिवेशनं होतात. यापैकी अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन मुंबईत होतात. तर हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होतं. गेल्या वर्षी नागपुरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *