1 जानेवारी 2020 रोजी भारतात 67,385 बाळांचा जन्म

2020 च्या पहिल्याच दिवशी भारतात 67,385 बालकांनी जन्म घेतलाय. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांमध्ये भारतात जन्मलेल्या बाळांची संख्या सर्वाधिक आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक चीनचा लागतो आणि दुसरा नंबर असतो भारताचा. मात्र 1 जानेवारी 2020 या दिवशी मात्र भारताचा नंबर पहिला होता आणि चीनचा दुसरा.

या दिवशी चीनमध्ये 46,229 बालकांचा जन्म झाला.

नायजेरियात 26,039 बालकांनी जन्म घेतला.

पाकिस्तानात 13,020 बालकांचा जन्म झाला.

अमेरिकेत 10,452 बालकांनी जन्म घेतला.

ही आकडेवारी UNICEF ने प्रसिद्ध केली आहे. या दिवशी जन्म झालेल्या बालकांसाठी UNICEF ने स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता.

जगभरात 1 जानेवारी 2020 रोजी जन्म घेतलेल्या बालकांची संख्या पाहता भारतात जन्म1 जानेवारी 2020 रोजी भारतात 67,385 बाळांचा जन्मलेल्या बालकांची संख्या 17% इतकी आहे.

1 जानेवारी रोजी आपल्या बाळाचा जन्म व्हावा यासाठी अनेक मातांनी सिझेरियन करून घेतली.

Exit mobile version