Thu. Jan 21st, 2021

पती आणि 2 प्रियकरांसोबत ‘तिने’ केली आपल्या प्रियकर नं. 3 ची हत्या!

बीडमध्ये एक विचित्र हत्याकांड घडलं आहे. आपल्या प्रियकराची प्रेयसीने हत्या केली आहे. विशेष म्हणजे यासाठी तिला साथ दिली तिच्या पती आणि आणखी दोन प्रियकरांनी…

तपासात समोर आला धक्कादायक प्रकार!

25 एप्रिल रोजी बीड-नगर रोडलगत असलेल्या विहिरीत एक कुजलेलं प्रेत आढळलं.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासात मृतकाची ओळख पटली.

या मृतकाचं नाव नितीन साबळे असून तो कडा येथील रहिवासी असल्याचं समजलं.

पोलिसांनी आणखी तपास केला असता या व्यक्तीच्या हत्येचा संशय बळावला.

या प्रकरणाचा उलगडा झाला, तेव्हा पोलीसही हैराण झाले.

कारण या प्रकरणात प्रेयसीने आपल्या पती आणि लव्हर नं.1, लव्हर नं.2 यांच्या साथीने लव्हर नं 3 असणाऱ्या नितीन साबळेची हत्या केली होती.

काय होतं प्रकरण?

गुलशन शेख हिने दोन महिन्यांपूर्वी संतोषशी लग्न केलं होतं.

मात्र तिचं इतर दोघांसोबतही प्रेम प्रकरण सुरू होतं.

एवढ्यावरच न थांबता गुलशन हिचं लव्हर नं. 3 नितीन साबळे याच्याशीही affair सुरू झालं.

ती 15 दिवसांपूर्वीच नितीन साबळेबरोबर फिरायला गेली.

या गोष्टीची माहिती होता इतर प्रेमिकांना राग आला.

त्यांनी नितीनला धमकवायला सुरूवात केली.

‘गुलशनपासून दूर राहा’ असं वारंवार बजावलं.

गुलशनच्या प्रेमात वेडा झालेल्या नितीनवर मात्र याचा काही परिणाम झाला नाही.

अखेर गुलशनला आणि तिच्या पतीला सहभागी करून इतर पाच जणांनी मिळून नितीनची हत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

गुलशन, तिचा पती संतोष आणि एका प्रियकराला अटक करण्यात आलंय. तर इतर तिघं फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *