Wed. May 12th, 2021

Corona : देशात 22 मार्चला जनता कर्फ्यूसह रेल्वेसेवा बंद राहणार

देशात कोरोनाचा धोका वाढतोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री राष्ट्राला 22 मार्च, रविवारी सकाळी 7 पासून ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. आता भारतीय रेल्वेने देखील 22 मार्चला संपूर्ण देशात ट्रेनबंदीची घोषणा केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने घोषणा केली आहे की, 21/22 मार्चच्या 12 वाजेपासून ते 22 मार्चच्या रात्री 10 वाजेपर्यंत या कालावधी दरम्यान कोणतीही गाडी धावणार नाही. यामध्ये लोकल, पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार 22 मार्चला 22 तास कोणतीही रेल्वे धावणार नाही.

मात्र रेल्वे लोकलच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे.

जनता कर्फ्युच्या वेळी लोकल आणि इतर ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *