Mon. Jan 24th, 2022

आणि तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात – अमोल कोल्हे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत इनकमिंग सुरू असून विरोधी पक्षातील नेते पक्ष सोडून प्रवेश करत आहेत. कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश करत असल्यामुळे गळती सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

भाजपा इनकमिंगवर राष्ट्रवादीची टीका –

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
तुमच्याकडे आम्ही आदराने बघत होतो आणि तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात असा सवाल अमोल कोल्हे विचारला आहे.
भाजपाच्या इनकमिंगवर अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर जोरादार टीका केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने जेवढं प्रेम दिलं तेवढ प्रेम कोणात्याच पक्षात मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *