Sun. Jan 16th, 2022

कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

येवला तालुक्यातील अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला खामगाव येथील असून  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संबंधित डॉक्टरवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य केंद्रात एकच गोंधल उडाला आहे.

नेमकं काय घडलं

येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल कॅम्पमध्ये 15 रुग्णांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाली.

त्यात येवला तालुक्यातील खामगाव येथील महिला वर्षा अहिरे ही महिला शस्त्रक्रियेसाठी आलेली होती.

काल सायंकाळी तिच्यावरती कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

त्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान या महिलेला अतोनात त्रास होण्यास सुरुवात झाली.

तिच्या नातेवाईकांनी ड्युटीवर असलेल्या सिस्टरला सांगितले असता. तिला इंजेक्शन देण्यात आले

तरी तरीही कमी होत नव्हता म्हणून नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क साधला.

त्यांना संबंधित डॉक्टरांनी व सिस्टरने तुम्ही झोपा आम्हाला झोपू द्या अरेरावीची भाषा केली.

रात्री अडीच वाजेच्या दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी रुग्णालयात गोधळ घालत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *