Sat. May 25th, 2019

नवरीने दिला नकार, रुसलेल्या जावयासोबत सासूच पसार!

5599Shares

लग्नसोहळ्यात अनेकदा बाका प्रसंग ओढावतो. देवाण घेवाण वा हुंड्यासारख्या चालीरीतींमुळे लग्नांमध्ये बऱ्याचदा अडचणी येतात. पण कानपूर जिल्ह्यात मात्र कहरच झालाय. एका लग्नसमारंभात अल्पवयीन वधूनं भर लग्नात नवऱ्याला नकार दिला. पण त्यानंतर जे घडलं, ते कल्पनेच्याही पलिकडचं होतं. रुसलेल्या जावयाचा हात धरून हळवी झालेली सासूच पळून गेली.

जावयाची समजूत काढता काढता सासूच पडली प्रेमात!

उत्तर प्रदेशातील भिसार गावात ही घटना घडलीय.

17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा घाट तिच्या घरच्यांनी घातला होता.

मुलीनं नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती.

तिच्या वडिलांचं 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं.

घरातील तीच सर्वात मोठी मुलगी असून तसंच तिला एक भाऊ आणि बहीणही आहेत.

आपल्या मुलीसाठी आईने चुलत नणंदेच्या मुलाचं स्थळ पसंत केलं.

नवरा मुलगा ठरल्याप्रमाणे 10 मार्चला वऱ्हाड घेऊन तिच्या घरी पोहचला.

मात्र, मुलीनं ऐनवेळी लग्नास नकार दिला.

कारण आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

ज्या मुलाचा फोटो दाखवला होता, त्याच्यापेक्षा दुप्पट वयाचा माणूस नवरा म्हणून गळ्यात पडत असल्याचं तिच्या लक्षात आलं.

यामुळे संतापलेल्या मुलीने “मी या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही”, असं निक्षून सांगत लग्नाला नकार दिला.

यावरून मंडपात खूप मोठा वाद झाला.

लग्नाला नकार देत मुलगी चिडून मंडप सोडूनच निघून गेली.

विवाहसोहळा रद्द झाल्यामुळे उपस्थित पाहुणे, वराती सगळेच आपापल्या घरी गेले.

आपलं लग्न मोडल्यामुळे रुसून बसलेल्या मुलाची मुलीच्या आईने समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र नवरा मुलगा खूपच दुःखी झाला होता.

रात्रभर मुलीची आई त्याची समजूत काढत होती.

मात्र या वेळात सासूला या नवऱ्या मुलाबद्दल इतकी दया आली, की ती त्याच्या प्रेमातच पडली आणि त्याच्याशी लग्न करायचं ठरवून आग्र्याला पळून गेली.

आपण नाकारलेल्या मुलाबरोबर आईच पळून गेली, हे कळल्यावर मुलीला धक्काच बसला.

तर नातेवाईकदेखील या प्रकाराने गोंधळून गेले.

तर दुसरीकडे सासूला तो मुलगा आधीपासूनच आवडत असल्याने तिने मुलीसाठी जाणीवपूर्वक त्याला पसंत केलं होतं, असं सांगण्यात येतंय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *