Sat. Nov 27th, 2021

एकाच वेळी दिला 6 बाळांना जन्म अन् त्यानंतर…

एखाद्या महिलेला जुळी किंवा तिळी मुलं झाली हे आपण ऐकलं असेल. मात्र मध्य प्रदेशमध्ये एक दुर्मिळ घटना घडली आहे. ती म्हणजे एका महिलेने चक्क सहा बाळांना जन्म दिला आहे. यात दोन मुली आणि चार मुलं यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मध्य प्रदेशातील श्योपुर येथे 23 वर्षीय महिलेने शनिवारी सकाळी 35 मिनीटांत एका पाठोपाठ एक अशा सहा बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचे नाव मुर्ति सुमन असून ती श्योपुरमधील सोंगडा गावातील असल्याचे समजले आहे.

या जन्म झालेल्या बाळांमध्ये 2 मुले जन्मानंतर काही वेळातच मरण पावली. तर बाकी 3 जणांचा पुढील आठ तासांत मृत्यू झाला असून एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.

त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. ही घटना श्योपुर जिल्हा रूग्णालयात घडल्याचे समोर आले आहे.

या महिलेने गरोदरपणात एकदाही सोनोग्राफी केलेली नव्हती. नवव्या महिन्यात प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रसूती करताना डॉक्टरांनाच धक्काच बसला.

एकाच वेळेला 6 मुले पाहुन डॉक्टरही चक्रावले. या जन्मलेल्या पाचही बाळांचे वजन 390 ग्रॅम ते 780 ग्रॅम इतके कमी असल्याने या बाळांचा मृत्यू झाल्याचे डॉ. आर. बी. गोयल यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *