Thu. Apr 22nd, 2021

‘तिची’ आत्महत्या की निर्घृण हत्या?

पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे एका 55 वर्षीय महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा गोविंद माळी असे या मृत महिलेचे नाव आहे. अलका गोपाळ पाटील वनाबाई अर्जुन दवणे गोपाळ विठ्ठल पाटील हनुमान भगवान पाटील अशी आरोपीची नावं असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.

दुंदरे येथील विश्वास गोविंद माळी याच्या आईचं गठण अल्पवयीन आरोपीची आई न विचारता घेऊन गेली.

याबाबत तीला विचारणा केली असता अलका पाटील व वनाबाई यानी त्याना शिविगाळ व मारण्याची धमकी दिली.

तसेच गोपाळ पाटिल व हनुमान पाटील यानी विश्वास माळी व त्याच्या आईला शिविगाळ केली.

त्यानंतर विश्वास याच्या आईला शारदा याना आणि गोविंद माळी यांना गावदेवी मंदिरात नेऊन शपथ घेण्यास लावले.

या प्रकारामुळे शारदा यानी आत्महत्या केली असा गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करून नंतर तिला फासावर लटकावून मारले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद न करता आत्महत्येस प्रवृत्त केलाचाच गुन्हा नोंद केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *