Mon. Dec 6th, 2021

कल्याणमध्ये बाजारात भरदिवसा महिलेची हत्या!

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या सनम करोटीया 30 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याण येथे घडली. 5 जुलै रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

सनम करोटिया ही महिला संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या अॅक्टीवा गाडीने कल्याण एपीएमसी मार्केटच्या आवारात आली होती.

त्या ठिकाणी अगोदरपासून दोन तरूण तिची वाट पाहत उभे होते.

ती आल्यानंतर त्या तरूणांनी तिच्याशी संभाषण केलं आणि त्यानंतर लगेच धारदार शस्त्राने तिच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले.

सनम रक्ताच्या थारोळयात खाली पडल्यानंतर दोघे हल्लेखोर तेथून पळून गेले.

एमपीएमसी मार्केटमधील हमालांनी सनमला नजीकच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी पळून गेलेल्या हल्लेखोरांपैकी एकाला अवघ्या तासाभरातच अटक केली.

बाबू धकनी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

दुसऱ्या मारेकऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे मारेकरी उल्हासनगरमधीलच असून एकमेकांच्या परिचयाचे होते.

मात्र हा हल्ला नेमका कशातून झाला, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कल्याणचे महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *