Thu. Oct 21st, 2021

रायगडात महिलेवर अत्याचार करून हत्या

 

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४२ वर्षीय आदिवासी महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी गुडू सुंदरलाल गुप्ता या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला रानसई पेण येथे राहणारी असून ती ३१ मार्च रोजी खालापूरातील वारद येथे गूडूच्या रिक्षातून आली होती. ती एकटी असल्याचा फायदा घेऊन रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला वारद येथील पुलाखाली हत्या केली. या प्रकरणी पीडीतेच्या पतीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खालापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *