Fri. Dec 3rd, 2021

लाखो रुपयांत तरूणींचा सौदा करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

लातूरमध्ये मुलींना पळवून नेत परजिल्ह्यात लग्न लावून लाखो रुपयांत मुलींचा सौदा करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लातूर जिल्ह्यातल्या या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे या टोळीची प्रमुख ही महिला आहे.

 

पोलिसांनी याप्रकरणी 6 महिलांसह 4 पुरुषांना अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वी लातूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला होता.

 

संशयित महिलेला खाकीचा धाक दाखवल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. शहरात वधूवर सुचक केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन गरिब मुलींचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत असल्याचा गोरखधंदा यामुळे समोर आला. पुनम शहाणे ही काँग्रेसची कार्यकर्ती या गोरखधंद्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *