Wed. May 12th, 2021

ताडोबामध्ये आता दिसणार महिला गाईड

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाच्या पुढाकाराने ताडोबा मोहर्ली बफर मध्ये नाईट सफारीकरीता सहा महिला गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाही असे असले तरी ताडोबा अंधारी प्रकल्प याला अपवाद ठरल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.

ताडोबाच्या घनदाट जंगलात आता रात्रीच्या सफारीत महिला गाईड मार्गदर्शन करणार आहेत. यात मोहर्ली गावातील दिव्या पालमवार,अरुणा पालमवार, सौ.मंजुषा शिडाम, सौ.निरंजना मेश्राम, सौ.गीता पेंदाम व सुषमा सोनुले यांचा समावेश आहे.

यांची नियुक्ती बर्ड वॉचर म्हणून करण्यात आली असून ताडोबाच्या जुनोना गेटवर 25 डिसेंबर पासून नाईट सफारीला या महिला गाईड जात आहे.

सफारी दरम्यान वाघाचे दर्शन भरपूर प्रमाणात होत आहे. त्यामुळे नाईट सफारीला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. नाईट सफारीकरीता जिप्सीची क्षमता फक्त सहा ठेवण्यात आलेली आहे.

यात गाईड चार्ज 500 रुपये, इंट्री चार्ज 1500 रु, जिप्सी चार्जेस 2000 घेण्यात येत आहे. महिला गाईडने प्रत्येक सफारीमध्ये पर्यटकांना वाघाचे दर्शन करून दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *