वेदनादायी! 30,000 ऊसतोड कामगार महिलांनी काढले गर्भाशय

पश्चिम महाराष्ट्रातील महिला ऊसतोड कामगार महिलांविषयी अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. 30 हजार महिला ऊसतोड कामगारांनी आपलं गर्भाशय काढून टाकलं आहे. यामागचं कारण अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील काही भाग अतिमागासलेला आहे.
या ठिकाणी रोजगार नसल्यानं अनेक महिला पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून जातात.
ऊसतोडणीचे काम सहा ते सात महिन्यांचं असतं.
या दरम्यान त्यांना मासिक पाळी येते, तेव्हा 4 दिवस सुट्टी घ्यावी लागते.
त्याचे पैसे त्यांना मिळत नाही. त्यांना कोणती सुविधाही मिळत नाही.
त्यामुळे तेथील 25 ते 30 वर्षाच्या 30 हजार तरुण महिलांनी आपले गर्भाशय (uterus) काढून घेतले आहेत.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून शासनानं योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. ते अमरावती मध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते.
गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्य़ांची 2 लाख खाती खासगी अँक्सिस बँकेत (Axis Bank) उघडली, शासनाची खाती ही राष्ट्रीयकृत बँकेत असतात, मागील पाच वर्षातील निर्णय चुकीचा होता आम्ही तो दुरुस्त करू असेही नितीन राऊत यांनी सांगितलं. तसंच गृह मंत्रीपद हे शिवसेनेकडे (Shivsena) राहणार असल्याचेही यावेळी नितीन राऊत यांनी सांगितलं.