Mon. Jan 17th, 2022

कोल्हापुरात महिलांचं आंदोलन चिघळलं, जलसमाधीचा प्रयत्न

मायक्रो फायनान्सची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात महिलांनी सुरू केलंले आंदोलन चिघळलं आहे. महिलांच्या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने 3 जानेवारी रोजी महिलांनी थेट पंचगंगा नदीमध्ये उडी घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी तातडीने नदीमध्ये उड्या घेत या महिलांना पाण्यातून बाहेर काढलं.

या सगळ्या प्रकारात एक महिला आंदोलक बेशुद्ध पडली. जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करत नाहीत अथवा कर्जमाफीचा आदेश काढत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या दिव्या मगदूम यांनी म्हटलंय.

दरम्यान आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील माने यांनी केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. मुख्यमंत्र्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *