Wed. May 19th, 2021

PMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू

 PMC बँक घोटाळ्याचा पाचवा बळी एक महिला ठरलीये. भारती सदारंगानी असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी PMC बॅंकेत 2 कोटी 25 लाख रुपये ठेवले होते. मात्र गेल्या काही दिवसात घोटाळा उघड झाल्यावर त्या टेंन्शनमध्ये होत्या. मुलीच्या भवितव्यासाठी त्यांनी आयुष्यभाराची कमाई PMC बँकेत ठेवली होती. ‘पंजाब ऍन्ड महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँके’त पैसे अडकल्याने आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
  याआधी मुलुंडमध्ये राहणाऱ्या मुरलीधर धारा 83 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. जवळपास 80 लाख रुपये बँकेत असुनही  त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध होऊ शकले नाहीत. अंधेरीत राहणाऱ्या संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेत 90  लाख रूपये अडकले  होते. त्यांचाही ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला.
मुलुंडमध्ये राहणारे फतमल पंजाबी यांचेही पैसे PMC बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं? या विवंचनेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 4 हजार 355  कोटी रुपयांच्या या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. या बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
14 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांपासून वाढून 40 हजार रूपये प्रति खातेधारक अशी केली होती. बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी खातेधार करत  आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *