Sat. Nov 27th, 2021

टॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल!

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका सुपरमार्केटमध्ये बायका भांडताना दिसत आहेत. या तीन ते चार महिला चक्क टॉयलेट पेपरसाठी भांडत आहेत. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील आहे.

काय आहे हा नेमका प्रकार?

सिडनी येथील एका सुपर मार्केटमध्ये Toilet Paper साठी दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ Social Media वर व्हायरल झाला आहे. यातील एक महिला 23 वर्षीय तर एक 60 वर्षीय आहे. दोन्ही महिलांना पोलिसांनी समन्स बजावलं आहे. मात्र अद्याप कुणाला अटक केलेली नाही.

टॉयलेट पेपरसाठी इतकी हाणामारी का?

जगभरात Corona Virus ची खूप दहशत पसरली आहे. ऑस्ट्रेलियातील लोकही त्याला अपवाद नाहीत. अनेकजणांनी शहरांतल्या सुपर मार्केट्समध्ये साफसफाईच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. सॅनिटायझर, मास्क्स इत्यादी गोष्टी विकत घ्यायला ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. यामध्येच स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असणारी वस्तू म्हणजे टॉयलेट पेपर. त्यामुळे टॉयलेट पेपर्स विकत घेण्यासाठीही लोकांनी सुपर मार्केटमध्ये गर्दी केली आहे.

हा सर्व प्रकार लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन सरकारने आता या सर्व वस्तूंच्या विक्रीवर मर्यादा आणल्या विशेषतः टॉयलेट पेपर्सच्या कमतरतेमुळे त्यांच्या खरेदीवर शासनानेच मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे टॉयलेट पेपर विकत घेण्यावरून महिलांमध्ये हाणामारीची ही घटना घडली आहे.

सुरुवातीला हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न स्टोअरच्या मालकाने केला. मात्र तरीही महिलांनी हाणामरी सुरूच ठेवली. अखेर या मालकाला पोलिसांनाच बोलवावं लागलं. पोलिसांनी महिलांना समन्स बजावलं आहे. आता  या महिलांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. अद्या त्यांना अटक केलेली नाही. मात्र कोरोनाच्या धसक्यामुळे स्वच्छतेबाबत जागरूक असलेल्या गरिकांवर काय वेळ आली आहे, हे मात्र या व्हिडिओतून चांगलंच लक्षात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *