Thu. Jul 2nd, 2020

…अन् तिने 2 वर्षाच्या मुलाचा खून करुन स्वत:लाही संपवले

पुण्यात एका सुनेने सासू-सासऱ्याच्या छळाला कंटाळून 2 वर्षांच्या मुलाचा खून करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेली महिला ही हडपसर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी होती.

या घटनेत हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस कॅन्स्टेबल अमित कांबळे यांची पत्नी जान्हवीने आत्महत्या केली आहे. या महिलेने आपला 2 वर्षांचा मुलगा शिवांश याच्या तोंडावर उशी दाबून त्याला मारून टाकलं. यानंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपवले. ही घटना पहाटे उघड झाली. 

 

pune-sucide-pic.jpg

 

महिलेचे आई-वडिल सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत आहेत. अमित कांबळे हा लाडका जावई असल्याने त्यांच्या विरोधात महिलेच्या महिलेच्या आई-वडिलांनी कुठलीही तक्रार केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रात्री बारा ते पहाटे पाच दरम्यान राहत्या घरी घडली. यावेळी कांबळे नाईट शिफ्टला कामावर होते.

जान्हवी यांनी आत्महत्येपूर्वी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘अमित तू माझ्यावर प्रेम करतोस, पण मला वेळ देऊ शकत नाहीस हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझा छळ करते.’ या प्रकरणाबाबत पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *