Mon. Jan 17th, 2022

‘ती’ एक ‘स्त्री’ आणि एक ‘नवदुर्गा’ही

आज ‘ती’ जेव्हा घरसंसार सांभाळत नोकरी, कामधंदा अर्थार्जनही करते, तेव्हा ती स्वतःमधलं ‘स्त्रीत्व’ सांभाळत स्वतःमधलं ‘पुरुषत्व’ किंवा ‘पुरुषार्थ’ही चांगल्या प्रकारे सिद्ध करते. एका बाळाला जन्म देणारी ती ‘स्त्री’ असते… एका पिढीला घडवणारी ती एक स्त्री असते… एक व्यक्ती म्हणून तिच्यामध्ये असणारं स्त्रीत्व आणि पुरुषत्व दोन्ही जबाबदार्‍या ती यशस्वीपणे निभावते.

आपल्याकडे स्त्रीने असा पुरूषार्थ निभावण्याला आता हळूहळू समाजमान्यता मिळाली आहे. किंबहुना या धावत्या यंत्रयुगात स्त्रीनेही पुरुषाबरोबर अर्थार्जन करावं, जबाबदार्‍या पार पाडाव्यात ही परिस्थितीची गरजच ठरली आहे.

स्त्रीच्या अंगी असणारी विविध कला-कौशल्ये, गुण-प्रयत्न-परिश्रम यांच्या जोरावर घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी ती समर्थपणे वावरते आहे आणि नेमकी हीच गोष्ट पुरुषाच्या बाबतीत घडताना दिसत नाही. पुरुषामध्ये असणारं ‘स्त्रीत्व’ चांगल्याप्रकारे विकसित झालेलं दिसून येत नाही. घरातली कामं करणं, भाजी चिरणं, जेवण करणं, रांगोळी घालणं, कलाकुसर करणं, सजावट करणं, सणवार साजरे करणं, परंपरा पाळणं, पाहुणचार करणं अशासारख्या गोष्टी स्त्रीयांनीच करायच्या असतात आणि पुरुषांनी ती केल्यास ‘बायकी’ कामं म्हणून हिणवली जातात. कमी प्रतीची ठरवली जातात.

सध्या नवरात्री सुरू आहे.  नऊ दिवस देवीच्या मूर्तीची लोक मनोभावे पुजा करतील.

नऊ दिवस तिच्यापुढे नतमस्तक होतील.

पण हे नऊ दिवसच फक्त का? असा प्रश्न मला नेहमी पडतो.

नवरात्री आल्यावरच लोकांना स्त्रीला महत्व द्यावंसं का वाटतं? स्त्री म्हणजे कधी माय, कधी बहीण, कधी बायको असते. तिचा आदर हा आपण नेहमीच केला पाहिजे असं नाही का वाटत लोकांना… नवरात्रीत दुर्गेसमोर नतमस्तक होणारे खरचं स्त्रीचा आदर करतात का, हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारावं. तसंच स्त्रीला खरंच या समजात मान- सन्मान आहे का? या जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत. ज्यांना आपल्या स्वत:च्या घरात मान, आदर नाही.

बाई जेवढी भावनिक असते तेवढी कणखरही असते तिचे ते नवदुर्गेचे रूप पण ती दाखवू शकते.ती सर्व काही करू शकेत तेव्हा स्त्रीला कुठेही कमी समजू नका. आयुष्यात स्त्रीचे खुप महत्व आहे हे कधीच विसरू नका तिला कधीच तुच्छ समजू नका. ती जर तुमच्या आयुष्यात नसेल तर तुमचे आयुष्य व्यर्थ आहे. मग ती कोणीही असो तुमची, बहीण किंवा बायको प्रत्येक स्त्रीचा आदर करा. नवदुर्गेला खुष करण्यापेक्षा आपल्या घरातील स्त्रीला नेहमी खुष ठेवा तिचा आदर करा तीला प्रेम द्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *