Wed. Jun 26th, 2019

शबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्यायालय

7Shares

शबरीमला मंदिरात 2 जानेवारी रोजी प्रवेश करणाऱ्या 2 महिलांना पूर्णवेळा सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिले आहेत. सुरक्षेव्यतीरिक्त अन्य मुद्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला तसेच त्यांची याचिका फेरविचार याचिकेशी जोडण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली.

आम्ही फक्त महिलांच्या सुरक्षेचा विचार करणार आहोत. अन्य मुद्यांचा नाही असं मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एल.एन.राव आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. फक्त दोनच नाही तर आणखी महिलांनीही मंदिरात प्रवेश केला आहे, केरळ सरकारने केलेला हा युक्तीवाद कोर्टाने विचारात घेतला नाही.

28 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 51 महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे असे केरळ सरकारच्या वकिलाने कोर्टाला सांगितले. उच्च न्यायालयाने नेमलेल्या मॉनिटरींग कमिटीविरोधातही युक्तीवाद ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या 2 महिलांपैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने मारहाण केली होती. 2 जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या 2 महिलांनी शबरीमलात प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला.

मंगळवारी सकाळी कनकदुर्गा पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली. त्यावेळी सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला. सासूने कनकदुर्गाच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यामध्ये कनकदुर्गा जखमी झाली. तिला पेरींतलमन्ना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

7Shares

Leave a Reply

%d bloggers like this: