Sun. Oct 17th, 2021

INDWvsNZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय, सेमीफायनलमध्ये धडक

टीम इंडियाने अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडवर अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घौडदोड कायम ठेवली आहे.

या स्पर्धेतील टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा विजय हा तिसरा विजय ठरला आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी निर्धारित २० ओव्हरमध्ये १३४ धावांचे आव्हान दिले होते. या प्रत्युतरात न्यूझीलंडला केवळ १२९ धावा करता आल्या.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक अमिलिया करने नाबाद ३४ धावा केल्या. मॅडी ग्रीनने २४ तर केटी मार्टिनने २५ धावा केल्या.

टीम इंडियाच्या प्रत्येक बॉलरने प्रत्येकी १ विकेट घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करताना न्यूझीलंडला टीम इंडियाने सुरुवातीपासूनच धक्के दिले. न्यूझीलंडने ठराविक अंतराने आपले विकेट गमावले.

दरम्यान याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.

यामुळे टीम इंडियाला बॅटिंग करणं भाग पडलं.

टीम इंडियाकडून सर्वाधिक शेफाली वर्माने ४६ धावा केल्या.

तर तानिया भाटीयाने २३ धावा केल्या.

रोझमेरी मेर आणि अमिलिया केर या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *