Sat. Jun 19th, 2021

INDWvSL : टीम इंडियाचा विजयी ‘चौकार’, श्रीलंकेवर 7 विकेटने विजय

टीम इंडियाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 विकेटने विजय मिळवला आहे. शेफाली वर्मा टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 114 धावांचे विजयी आव्हान टीम इंडियाने 3 विकेट गमावून 14. 4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 116 धावा केल्या.

टीम इंडियाकडून सर्वाधिक 47 धावा शेफाली साधूने केल्या. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधिनी आणि शशिकला श्रीवर्धने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची दिलासादायक सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यात 34 धावांची भागीदारी झाली.

टीम इंडियाला पहिला धक्का 34 धावांवर स्मृती मानधनाच्या रुपात लागला. स्मृती मानधना 17 धावांवर प्रबोधिनीच्या बॉलिंगवर कॅचआऊट झाली.

यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची पार्टनरशीप झाली.

दरम्यान याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकेला टीम इंडियाच्या बॉ़लर्सने ठराविक अंतराने झटके दिले.

लंकेकडून सर्वाधिक 33 धावा कॅप्टन चमारी अट्टापटूने केल्या. तर कविशा दिलहारीने नाबाद 25 रन्स केल्या.

तर टीम इंडियाकडून सर्वाधिक 4 विकेट्स राधा यादवने घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स टिपल्या. तर दिप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *