Wed. Jul 28th, 2021

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मधून ‘सविता भाभी’ गायब

आगामी मराठी सिनेमा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मधून ‘सविता भाभी’ हे पात्र आता गायब होणार आहे. निलेश गुप्ता यांनी सविता भाभी पात्रावर आक्षेप घेतला होता. सविता भाभी हे नाव आपल्या कॉमिक पात्राचं आहे, असा दावा करून त्यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर अखेर या सिनेमातील सविता भाभी या पात्राचं नाव बदलण्यात आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात ‘सविता भाभी’चं पात्र साकारत आहे.

पुण्याच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी ‘सविता भाभी, इथंच थांब’ अशी होर्डिंग्ज लागली होती. काही दिवसांनी या होर्डिंग्जचा अर्थ लोकांच्या लक्षात आला. ‘सविता भाभी, इथंच थांब’ हे गाणं ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सिनेमात आहे. तसंच ‘सविता भाभी’ हे कॅरेक्टरही या सिनेमात आहे. या सिनेमावर ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता. हा सिनेमा अश्लील असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा वाद शमण्यापूर्वीच या सिनेमातील कॅरेक्टर ‘सविता भाभी’ पात्राच्या नावावरून वाद उफाळून आला. मात्र आता सिनेमानिर्मात्यांनी मागे हटत सिनेमातील ‘सविता भाभी’ हे पात्र बदलणार आहे. ‘सविता भाभी’ हा शब्द 58 ठिकाणी सिनेमात वापरला गेलाय. तो शब्द आता ऐकू येणार नाही. तसंच ‘सविता भाभी, इथंच थांब’ हे गाणंही पाहायला मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *