Mon. Dec 6th, 2021

Coronavirus : ‘वर्क फ्रॉर्म होम’ नाकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

खासगी कंपन्यांचा सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद नाही

कोरेनाच्या भितीनं संपूर्ण जग हादरले असतांना भारतही कोरोनाच्या संदर्भात सतर्क आहे. मात्र तरीही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्र सरकारही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना राबवत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीमध्ये जाण्यास टाळण्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.

जास्त गर्दीची शहर असलेल्या शहरांमध्ये गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॅाल्स, जिम सरकारने बंद केलेत. तसंच शहरातील सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के ठेवण्याचे आवाहन सरकारने केलंय.
ज्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता कामावर येणे शक्य असेल त्याच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र तरीही खासगी कंपन्या सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देत नसल्याच दिसतंय. या कंपन्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा कंपन्यांवर कारवाई करावी असं मत कर्मचारी व्यक्त करत आहे.

खासगी कंपनातील एका कर्मचाऱ्याने तर आपली ही व्यथा ट्विटरवर शेअर करून मुंबई पोलिसांना टॅग केलेय. या ट्विटला प्रतिसाद देत पोलिसांनी या बाबत माहीती मागवली आहे. त्यामुळं लवकरच अशा कंपन्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कंपन्या सुट्ट्याही देत नाही आणि घरुन काम करण्याची परवानगीही देत नाही. त्यामुळं आमच्या जीवाची काळजी कोण घेणार असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *