Fri. Aug 6th, 2021

पगारासाठी त्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

पिंपरी-चिंचवडमध्ये पगार होत नसल्याच्या कारणातून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी 1 फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आजारानेही त्रस्त होता. मृत व्यक्तीने स्वत:च्या राहत्या घरात आत्महत्या केली.

काय घडलं नेमकं?

रामदास उकिरडे असं आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असून ते 51 वर्षांचे होते.

ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते.

त्यांच्यावर चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

एका शासकीय औषध कंपनीत रामदास कामाला होते.

गेल्या काही वर्षांपासून त्यांचा पगार होत नव्हता.

पगार होत नसल्याने ते तणावाखाली होते.

उकिरडे हे सतत पगाराविषयीची घरच्यांशी चर्चा करायचे.

2-3 महिन्यांपासून आत्महत्या करणार असल्याचे ते घरच्यांना म्हणायचे.

त्यांच्या पत्नीचे ब्युटी पार्लर आहे.

शुक्रवारी दुपारी त्यांची पत्नी दुकानात जात होती.

झोपायचं असल्यामुळे घराचा दरवाजा बाहेरुन लावण्यास त्यांनी पत्नीला सांगितले होते.

मात्र त्यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांची पत्नी घरी आल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले.

वाकड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *