Sat. Nov 27th, 2021

बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे 25 वर्षीय कामगाराचा 11 व्या मजल्यावरून पडून मृ’त्यू

मीरा रोडच्या मेरी गोल्ड परिसरात ‘गौरव वूड’ या इमारतीच्या साईडवर रवी बिल्डर च्या हलगर्जीपणा मुळे 25 वर्षीय तरुणाला 11 व्या मजल्या वरून पडून आपला जीव गमवावा लागला. कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्यामुळे ही बिल्डरच्या दबावामुळे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दाखल घेतली नाही असा आरोप मजदूर युनियनने आता केला आहे.

कोणत्याही प्रकारची सामुग्री आणि हेल्मेट तसंच इतर गोष्टी सेफ्टीसाठी देण्यात आल्या नव्हत्या.

शेवटी बिल्डर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारांनी कनकिया पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं.

जो पर्यंत बिल्डरला अटक करत नाही तसंच नुकसान भरपाई देत नाही, तो पर्यंत आम्ही मृतदेह घरी घेऊन जाणार नाही अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली.

मात्र नुकसानभरपाई मिळत नाही म्हणून मीरा भाईंदर शव विच्छेदन केंद्रावर कामगार आणि कुटुंबातील व्यक्ती नि पुन्हा ठिय्या मांडला होता.

प्रसार माध्यम आणि कामगार युनियनमुळे मृत कामगारांच्या कुटुंबाला रवी बिल्डरकडून 12 लाखांचीआर्थिक मदत देण्यात आली.

5 लाख रोख आणि 7 लाखाचा चेक मृत कामगार च्या पत्नीकडे देण्यात आले.

त्यानंतर कुटुंबियांकडून शवविच्छेदन केंद्रातून मृतदेह अंतिम विधी साठी नेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *