कोरोनाच्या भितीमुळे उपचारासाठी डॉक्टरांकडे न गेल्याने अनेकांचा कॅन्सर पोहोचला चौथ्या टप्प्यात
4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त….

देश कोरोनाच्या संकटाचा सामना कर असताना याचा सर्वांधिक फटका कर्करूग्णांना बसला आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने अनेक रूग्ण भितीपायी रूग्णालयात उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करत होते. वेळीच निदान व उपचार न मिळाल्याने अनेक रूग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात पोहोचले आहेत. अशा स्थितीत कर्करूग्णांना वाचवणे डॉक्टरांसाठी एक आव्हान आहे. यासाठी कर्करोगावरील उपचारपद्धतीतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अनेक कर्करूग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.
एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट संयुक्त वैद्यकीय संचालक डॉ. धैर्याशील सावंत यांनी सांगितले की, कोरोनामुळे जगभरात एकच थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांसह कर्करूग्णांवरही मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने अनेक लोक उपचारासाठी डॉक्टरपर्यंत पोहचू शकले नाहीत. काही रूग्णांना स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. यामुळे बहुतांश रूग्णाना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तर काही रूग्णांवर उपचारच झालेले नाहीत. तर काही रूग्णांवर चुकीचे उपचार करण्यात आले आहे. मे ते जुलै महिन्यापर्य़ंत आमच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना डॉक्टरांचे परवनगी पत्र घ्यावे लागत होते. त्यामुळे रूग्ण भितीपायी डॉक्टरांकडे येत नव्हते. अशास्थितीत आम्हाला रूग्णावर उपचार करता आले नाहीत.
डॉ. सावंत पुढे म्हणाले की, आता वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक रूग्ण चौथ्या टप्प्यात कर्करोग आल्याववर उपचारासाठी येत आहेत. अशा रूग्णांवर उपचार करतान आम्हाला दोन पावलं पाठीमागे जाऊन पुढील उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे कोरोना काळात अनेक कर्करूग्णांना त्रास सहन करावा लागला आहे. याशिवाय किमोथेरपीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे कोरोनाची लागण कर्करूग्णांना पटकन होऊ शकते. या भितीपायी अनेक रूग्ण किमोथेरपी घेण्यास टाळत होते. तसेच रेडिएशन थेरपी केंद्र बंद असल्याने रूग्णांना ही थेरपीही घेता आली नाही. त्यामुळे कोरोना काळात अनेक रूग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने ज्यांचा कर्करोग बरा होऊ शकत होता. असे काही रूग्ण कर्करोगच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात पोहोचले आहेत.