Fri. Aug 6th, 2021

जागतिक ग्राहक हक्क दिन : तुम्हाला तुमच्या ‘या’ 6 हक्कांची जाणीव आहे का?

आज जागतिक  ग्राहक हक्क  दिन आहे. बाजारपेठेत ग्राहक हा राजा आसतो. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात विविध प्रकारच्या जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला.  या कायद्यानुसार ग्राहकांना 6 हक्क प्राप्त झाले आहेत. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे  हक्क आणि जबाबदाऱ्या काय असतात, याविषयी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त ही खास माहिती.

ग्राहकांचे हक्क कोणते ?

1.सुरक्षिततेचा हक्क-

जेव्हा ग्राहक एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं. खरेदी केलेल्या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागते.

2. माहितीचा हक्क-

ग्राहकाला एखादी  वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

3.  निवडीचा हक्क-

ग्राहकाला एखाद्या वस्तूची योग्य किंमत, गुणवत्ता याचा विचार करुनच वस्तूची निवड करण्याचा हक्क आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार आहे.

4. तक्रार निवारणाचा हक्क-

ग्राहकाला जर वाटत असेल की आपली फसवणूक झाली आहे तर  ग्राहकांला ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे.

5  ग्राहक शिक्षणाचा हक्क-

बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची माहिती ग्राहकाला  असणं आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.

6 आरोग्यदायी पर्यावरणचा हक्क-

सदृढ जीवन जगण्यासाठी ग्राहकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबर मत प्रदर्शन करण्याचा ग्रहाकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क  ग्राहकाला आहे.

ग्राहकांची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या-

कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता  किंवा स्वच्छतागृहाचा वापर करु शकता.

सुट्टे पैसै नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या चॉकलेट देऊ शकत नाही.

जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा ठोकू शकता.

ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात,संख्येत बरोबरच मिळतील याची खातरजमा करुन घ्यावी.

ग्राहकांनी वस्तूंसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करु नये.

पॅकबंद मिठाई, ड्रायफुट्स्, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तू आदीच्या वेष्टणावर वस्तूचं नाव, उत्पादकाचं नाव, आवेष्टकाचं नाव ,ग्राहक हेल्पलाईन क्रमांक आदी बाबी बाबींचा उल्लेख केला आहे की नाही हे ग्राहकांना तपासून घ्यावं.

वस्तूवरील छापील किंमतीत खाडाखोड आढळल्यास आवेष्टित वस्तू खरेदी करु नये.

चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही.

जर कोणी बंदी घालत असेल तर नागरिकांनी यासंदर्भात तक्रार करावी. प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी.

सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.

वस्तू खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट तपासा.

ऑनलाईन खरेदी करताना सजग रहा.

15 मार्च हाच ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ दिन का ?

15 मार्च या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे.

1362 साली संयुक्त राष्ट्राचे राष्ट्रपती जॉन एफ केनडी यांनी 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून जाहीर केला.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांना चार हक्क प्रदान केले.

सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्वाचा हक्क त्यांनी ग्राहकांना दिला.

सर्व ग्राहकांना त्यांचे हक्क मिळावेत आणि उद्योजक आणि व्यावसायिकांकडून त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

येथे करावी तक्रार-

ग्राहकाला वस्तू खरेदी केल्यानंतर  अपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर  ग्राहक तक्रार करु शकतात.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग  आहे.

तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच  स्थापन करण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम मुख्यत्वे या मंचांकडून होत असते.

एखाद्या ग्राहकाला जिल्हा मंचाकडून दिलेला निर्णय मान्य नसेल तर त्याविरुद्ध तो राज्य आयोगाकडे दाद मागू शकतो.

राज्य आयोगानेही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याला न्याय दिला नाही तर तो त्या तक्रारीविरुध्द केंद्र शासनाच्या आयोगाकडे दाद मागतो.

यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशी ग्राहक मंचांसाठी फी ठेवलेली असते.

90दिवसांच्या आत ग्राहकांच्या तक्रारींचे या मंचांनी निराकरण करावे, अशा सूचना  मंचांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *