Thu. Jun 20th, 2019

World Cup 2019 : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात

0Shares

वर्ल्डकपमध्ये सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानात हा सामना रंगला असून या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दिलेल्या 353 धावांच्या आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया 316 धावांपर्यंत मजल मारू शकले आहे.

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांच आव्हान

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

रोहित शर्मा 57 तर शिखर धवन 117 धावांपर्यंत मजल मारली.

रोहित शर्माने 70 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार खेचत 57 धावा केल्या.

त्यानंतर हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार यांच्या मदतीने 48 धावा केल्या.

कर्णधार कोहलीने ८२ धावा केल्या. तर धोनीनेदेखील झकास खेळी करत १४ चेंडूत २७ धावा केल्या.

भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३५२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले.

आव्हानाचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खेळी

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अॅरॉन फिंच यांनी मैदानात चांगली सुरूवात केली आहे.

फिंच ३६ धावांवर धावचीत झाला. वॉर्नर आणि स्मिथ जोडीने ऑस्ट्रेलिचा डाव सावरला.

वॉर्नर 56 वर बाद झाल्यानंतर ख्वाजा आणि स्मिथने मैदानात खेळ सावरला.

स्मिथ-ख्वाजाची भागीदारी भारताच्या नाकी नऊ ठरत असताना भुवनेश्वर कुमारने भारताला कमबॅक करुन दिलं.

भुवनेश्वरने सामन्याच्या 40 व्या षटकात स्मिथला 69 बाद केलं. अखेरीस भारतीय संघाने सामना ३६ धावांनी जिंकला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: