Fri. Sep 30th, 2022

या अवलियाने असं जपलं क्रिकेटवरचं प्रेम

ठाण्यात एक असा अवलिया आहे ज्याच्याकडे सर्व क्रिकेटपटूच्या स्वाक्षऱ्या आहेत. भारताने 2 वेळा जिंकलेल्या विश्व कपच्या खेळाडूंच्या सह्या त्यांच्या संग्रही आहेत. सतीश चाफेकर असं या अवलियाचं नाव आहे. त्यांच्याकडे 300 हुन अधिक बॅट आहेत. ज्यावर विविध क्रिकेटपटूच्या सह्या आहेत. अनेक यादगार किस्से देखील त्यांच्याकडे आहेत.

या अवलियाकडे आहेत क्रिकेटपटूच्या स्वाक्षऱ्या

चाफेकर हे ठाण्यात राहतात. क्रिक्रेट बद्दल त्यांना लहानपणापासून खूप प्रेम आहे.
त्यातूनच त्यांची सही घेण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी 1979साली पहिली सही क्रिकेटपटूची घेतली.
त्यानंतर हा छंद आजतागायत सुरू आहे. कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्या पासून आता पर्यंत धोनी, विराट कोहली यांच्या सह्या त्यांच्याकडे आहेत.
1983 प्रमाणे 2011 साली विश्वकप जिंकलेल्या सर्व भारतीय खेळाडूंच्या सह्या त्यांच्याकडे संग्रही आहेत.
सचिन तेंडुलकरच्या असंख्य सह्या त्यांच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे काही सह्या फोटो, बॉल, पॅड आणि ग्लोस् वर घेतलेल्या आहेत.
आजच्या मॅच बद्दल विचारले असता त्यांनी भारत एकतर्फी हा सामना जिंकेल असे त्यांनी सांगितले.
तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांपर्यंत भारत नक्की पोचेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.