Jaimaharashtra news

World Heart Day 2018: अशी घ्या हृदयाची काळजी

आज देशभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणजेच जागतिक हृदय रोग दिन साजरा करण्यात येतोय. हृदयरोग आणि स्ट्रोकसह कार्डिओव्हस्कुलर रोगांविषयी जागरुकता वाढविण्यासाठी समर्पित हा दिवस असतो.

दरवर्षी 29 सप्टेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. कार्डिओव्हस्कुलर रोग हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण होत चालला आहे. 

दरवर्षी जगात 17.5 दशलक्ष लोकांचा जीव या रोगमुळे होत असल्याचा दावा विविध हृदय रोग संस्थानांनी केला आहे.

उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्टेरॉल असलेले लोक, मधुमेह किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका जास्त असल्याचे समोर आले आहे. आज

जागतिक हृदय रोग दिनाच्या निमित्ताने जगातील विविध संस्था हृदय सुदृढ ठेवण्यासाठी जागृती करत आहे. आज सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येईल.

अशी घ्यावी काळजी – 

* मीठ, मिरपूड आणि तळलेले अन्न कमीतकमी वापर कमी केला पाहिजे किंवा शक्य असल्यास करूच नये.

* हिरव्या पालेभाज्या आणि फळे मोठ्या प्रमाणावर खाल्या पाहिजेत.

* जर रुग्ण धूम्रपान, दारू किंवा इतर कोणत्याही औषधी पदार्थांचा वापर करीत असेल तर त्याने तूप, बटर इ. पदार्थ खाणे कमी करणे आवश्यक आहे.

* दररोज अंडे आणि लसूण खावे.

* मुरंबा मुख्यतः हृदयरोग्यांनी खाऊ नये.

* आपल्या जीवनचर्यात व्यायाम आणि सकाळी चालणे आवश्यक आहे. मानसिक शांतीसाठी ध्यान केले पाहिजे.

Exit mobile version